Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

महाराष्ट्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

निटूर: येथील महाराष्ट्र विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातर्फे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रजासत्ताक, देशभक्ती या विषयावर अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निटूरचे व्हॉइस चेअरमन दिनकर(नाना) निटूरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश संपादन केलेल्या खेळाडूंचा व विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या प्रगती बाबत चढता क्रम दर्शवत इयत्ता दहावी मध्ये 90% पेक्षा अधिक गुण घेतलेल्या 19 विद्यार्थ्यांचे प्रगती दर्शवली. यावेळी मंचावर निटूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर(नाना) निटुरे, लक्ष्मण मगर, के वाय पटवेकर, महेश तापडिया, बाबू सरदार, मोहम्मद शेख, राजकुमार सोनी, हबीब शेख, शामराव शिंदे सह मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, हनुमंत भोयभार, माणिक नाईकवाडे, रवींद्र सूर्यवंशी, नर्सिंग पाटील, विशाल जाधव, राजेंद्र निटुरे, अनिल देशमुख शिक्षक,शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोईबार यांनी केले.


Post a Comment

0 Comments