Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रामपंचायत उन्हात शेत शिवारात: शेत रस्ता विकासासाठी प्राधान्य देणारी टीम

भादा ग्रामपंचायत उन्हात शेत शिवारात: शेत रस्ता विकासासाठी प्राधान्य देणारी टीम


बी डी उबाळे 

औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत कडून मोठ्या प्रमाणात शेत रस्ते पानंद रस्ते कामे मंजुरीसाठी शेतशिवारात ग्रामपंचायत कडून पाहणी केली जात आहे. गुरुवार दिनांक 20 एप्रिल 23 रोजी भादा तालुका औसा शेत शिवारामध्ये ग्रामपंचायत कडून नवीन आणि प्रस्तावित रस्त्यासाठी नरेगा अभियंता नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भादा शिवारामध्ये ग्राम ग्रामपंचायत उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, ग्रामरोजगार सेवक बालाजी उबाळे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, तानाजी गायकवाड, पांडुरंग बनसोडे, हनुमंत दरेकर आणि गावातील शेत शिवारातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते.


यावेळी भादा येथील सध्या तीन रस्ते प्रस्थापित करण्यासाठी योग्य असून त्या रस्त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती ग्रामपंचायत कडून तांत्रिक अधिकारी नितीन चव्हाण यांच्याकडे करण्यात आली असून भादा शेत शिवाराचा विकास साधण्यासाठी या रस्त्यांची मान्यता आवश्यक असल्याचे ग्रामपंचायत कडून सांगितले जात आहे. गावातील शेतशिवरात रस्त्याचे जाळे निर्माण करून शेतकऱ्याचा विकास साधला जाईल असे ग्राम पंचायत भादा सरपंच, उपसरपंच आणि सदस्य  टीमकडून माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments