Latest News

6/recent/ticker-posts

नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला काव्य रत्नाने सन्मानित भादेकर स्नुषा डॉ. कविता किर्तें(उबाळे)

नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला काव्य रत्नाने सन्मानित भादेकर स्नुषा डॉ. कविता किर्तें(उबाळे)


बी डी उबाळे 

औसा : नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या महिला शक्ती कवितायोगीतेमध्ये भादेकर स्नुशा श्रीमती डॉ कविता किर्ते(उबाळे)यांच्या कवितेचा सहभाग आणि सन्मान झाला असून त्या सुशीलादेवी देशमुख कॉलेजच्या प्राध्यापिका तथा हिंदी विभाग प्रमुख आहेत. देश-विदेशांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून अंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. अंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त नेपाळ मध्ये एक ऐतिहासिक महत्व असलेली अंतरराष्ट्रीय महिला शक्ति कविता प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले होते. महिला सुरक्षा, शिक्षन तथा सम्मानासह हिंदी काव्य लेखनमध्ये महिला पुरुष यांना प्रोत्साहित करनेसाठी तथा नेपाळ मधील भारत मैत्री सम्बंध विकसित व्हावे हाच एक उद्देश ठेऊन या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. नेपालच्या सु-विख्यात साहित्यिक संस्था " शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सम्मान फाउन्डेशन नेपाळ " द्वारा अंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त आयोजित " अंतरराष्ट्रीय महिला शक्ति कविता प्रतियोगिता २०२४ "चे भव्य असे परिपूर्ण दिवस साजरा करण्यात आला. या प्रतियोगिता मध्ये चार देशानी नेपाल, भारत, यू एस तथा तंजानिया च्या  साहित्यिकांचा सहभाग घेतला होता. या प्रतियोगिता मध्ये इतर देशासह भारत्तातील 20 राज्यातील 625 महिला-पुरुष साहित्यिकांनी आपल्या कविताच्या माध्यमातून प्रतियोगिता मध्ये हिस्सा घेतला होता. यामध्ये उत्कृष्ट 100 ची प्रथम श्रेणी मध्ये निवड करण्यात आली.

आनंदाची गोष्ट म्हणजे की, या स्पर्धेमध्ये दृष्टिहीन स्पर्धकासह नेता, अभिनेता, पोलिस तथा इतर क्षेत्रातील अधिकारी आणि अन्य सन्माननीय स्पर्धक ही सहभागी झाले होते. उत्कृष्ट कविताच्या आधारावर 100 ची निवड करून त्यांचा सत्कार " महिला शक्ति काव्य रत्न " चा बहुमान देऊन सन्मान करण्यात आला आहे. आयोजक संस्था शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सम्मान फाउन्डेशन नेपाळचे अध्यक्ष आनन्द गिरि मायालु म्हणतात की," स्त्रिया या देवीचे रूप असतात त्यांचा सर्व धर्माने सन्मान केला पाहिजे. महीलामुळेच पुरूषाचे अस्तित्व आहे. महिला पुरुष सोबत चालन्यानेच सृष्टी सुरक्षित राहणे शक्य आहे. सदरील प्रतियोगितीमध्ये महीलाचा उल्लेखनीय सहभाग घेतला असून उत्कृष्ट रचनाकाराचां विस्तृत परिचय विश्वाच्या सर्वात मोठ्या साहित्यिक परिचय डायरेक्ट्रीमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याचे समजते. नेपाळ मध्ये 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक महत्व व गौरवशाली सम्मान समारोह मध्ये सहभागी होनाऱ्या स्पर्धकांना सहभाग घेण्याचा मान सन्मान मिळणार आहे. माहितीस्तव शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सम्मान फाउन्डेशन नेपाल, नेपालचे शिक्षण, पर्यटन, भाषा, साहित्य, कलाआणि संस्कृतिच्या विकासासाठी निरंतर मोठ मोठे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यांच्या आयोजनामुळे नेपाळ सरकारचे प्रतिनिधि तथा देश विदेशच्या सर्व प्रबुद्ध गणमान्यांचां मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

Post a Comment

0 Comments