Latest News

6/recent/ticker-posts

लातूर च्या यशवंत विद्यालयाचे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश 98.78% निकालाने यशाची परंपरा कायम

लातूर च्या यशवंत विद्यालयाचे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश 98.78% निकालाने यशाची परंपरा कायम

लातूर : येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी १६५ विद्यार्थी बसले होते पैकी १६३ उतिर्ण झाले असून ९० % पेक्षा अधिक गुण घेणारे एकूण ७ विद्यार्थी आहेत.

शाळेतुन प्रथम- पटवेकर महेबुब जावेद ९६.२० % दुतीय- मुंडे शुभम संभाजी ९५.६ ० % तृतीय- ठाकूर रुपेश राजकुमार ९४.२०% आले आहेत. मडके आशीष संतोष ९३.८० %, बोडेवार सुमीत सतिष ९३ %, शेळगे महादेव गोपाळ ९२.८० %, बोळेगावे प्रतिक महादेव ९१ % तर २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत. सदरील यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ.गोपाळराव पाटील, सचिव प्राचार्य. अनिरुद्ध जाधव, सहसचिव- गोपाळ शिंदे, ॲड.सुनील सोनवणे- शालेय समिती अध्यक्ष, आनंदराव माने- प्रभारी मुख्याध्यापक, दयानंद कांबळे- उपमुख्याध्यापक, एस.डी.जाधव- शिक्षक प्रतिनिधी, महावीर काळे- परीक्षा नियंत्रक, अप्पाराव पुंडकरे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments