Latest News

6/recent/ticker-posts

अँड विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयाचा निकाल १०० टक्के

अँड विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयाचा निकाल १०० टक्के


लातूर : जीवन विकास संचलित अँड विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रति वर्षाची यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.

विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी पैकी २४ विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम योगेश हरिश्चंद्र मंदे ७०.०% द्वितीय अश्विन भगवान पाटील ६९.२०% तृतीय शुभम दिलीप देवकते ६९.०% घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली  बुरांडे एस एस,वाघमारे बी.पी, भोसले डी एस, गायकवाड जे व्ही, घुगे एस, मंडाळे एस एस,बनसोडे एस. डि, शहाणे बी.बी, गवळी एस, पाळणे एम एस, थडकर एन बी यांनी मार्गदर्शन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे मार्गदर्शक आमदार अमितभैया देशमुख, जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंगराव देशमुख, संजय निलेगावकर, ललितभाई शहा, डॉ. चेतन सारडा, अभय शहा, पी व्ही कुलकर्णी, प्राचार्य राजेश शर्मा,जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments