Latest News

6/recent/ticker-posts

औशात पीक विम्यासाठी शेतकरी दिवसाच पेटविनार मशाल

औशात पीक विम्यासाठी शेतकरी दिवसाच पेटविनार मशाल


बी डी उबाळे 

औसा : सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्याचे मरण! आहे. याची प्रचिती आजच्या सरकारकडे पाहिल्यावर येते. सतत खोटी आश्वासने देऊन सत्तेत येऊन शेतकऱ्याची माती करणाऱ्या सरकारने 10 जून पूर्वी पीकविमा आणि विविध तलावातून स्वखर्चाने गाळ काढलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये द्यावे अन्यथा 18 जून रोजी औशात सरकार विरोधात दिवसा मशाली पेटवल्या जातील असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.

खरीप हंगामाच्या मशागती सुरु झालेल्या आहेत. अगोदरच शेतकरी मागील वर्षी निसर्गाच्या अस्मानी संकटात बेजार झालेला असताना सरकारने सुलतानी संकट घालून शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत टाकण्याचे महापात केले आहे. सोयाबीनचा पडलेला भाव, शेतकऱ्यांची तूर अन साठेबाजार करणाऱ्या व्यापाऱ्याची सुगी हे सरकारने जाणून बुजून ठरवले आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढला मात्र उत्पाद्दीत माल बेभाव किमतीत विकावा लागला पर्यायाने शेतकरी उध्वस्त झाला आहे पावसात खंड,येलो मोझ्याकच्या प्रादुर्भावामुळे सरकार ने तातडीने मदत देणे आवश्यक होते परंतु सत्तेच्या मस्तीत गुंग असणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार अन विरोधी पक्षाचे सामान्य शेतकऱ्यांप्रति असलेले पुतळा मावशीचे प्रेम कोणत्या कामाचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

राज्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, राजीव कसबे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी राज्यभर अनेक प्रकारचे आंदोलने केली. त्यावेळी आपल्या भागात नुकसान भरपायी म्हणून पीकविमा कंपनीने 25 टक्केच्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली. उर्वरित 75 टक्के रक्कम अद्याप बाकी आहे शिवाय बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचितच आहे. अश्या वेळी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन रेलरोको, जेलभरो अशी निर्वाणीची आंदोलने केली आहेत परंतु विरोधी बाकावरील मंडळी सुद्धा आवाज उठवायला तयार नाही म्हणून आता शेतकरीच पीकविमा तात्काळ द्यावा, विविध तलावातील गाळ काढलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रू मदत द्यावी अशा आपल्या न्याय्य मागण्या घेऊन 18जून रोजी दिवसा सरकारच्या विरोधात मशाली पेटवून आंदोलन करणार आहेत. या निवेदनावर शेतकरी नेते राजेंद्र मोरे, राजीव कसबे, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, अनिल शेंडगे, भास्कर पाटील आदिसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments