Latest News

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नसेवा मंडपाचे भूमिपूजन

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नसेवा मंडपाचे भूमिपूजन


लातूर : लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 01 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौक येथे अन्नसेवा देण्यात येणार असून "एक घास आपुलकीचा' लोकनायक संघटनेचा" या शीर्षकाखाली 105 ब्रास मंडपामध्ये अन्न सेवा दिली जाणार आहे. या अन्न सेवा मंडपाचे लातूर शहर विभागीय पोलीस अधीक्षक श्री रनजीत सावंत व भाजपा नेते संतोष बेंबडे यांच्या हस्ते आज दिनांक 30 जुलै रोजी भूमिपूजन करण्यात आले.

साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकनायक सामाजिक संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवते त्याचाच भाग म्हणून यावर्षी डीजे डॉल्बी, स्वागत पीठ, विद्युत रोषणाई यासारख्या लाखो रुपयाचा वाया जाणारा खर्च टाळून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या अनुयायांना अन्नसेवा व पाणीसेवा दिले जाणार आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती असल्यामुळे 105 ब्रासचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार ॲड. बालाजी कुटवाडे यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवटे, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील, लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ, सचिव बंटी गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, पत्रकार नेताजी जाधव, समाजाचे नेते कैलास कांबळे, सुनील बसपुरे, आनंद भाई,  वैरागे, शाम चव्हाण, प्रीती माऊली लातूरकर, सरफराज सय्यद, अनिल जाधव आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. या अन्न सेवेचा लाभ अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी किसन कदम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments