खेळाच्या विविध पैलू मध्ये भविष्य घडवू शकता- महेश पाळणे
लातूर : खेळामुळे आरोग्यासह सर्वांगीण विकास होत असतो.त्यामुळे मानवी जीवनात खेळाला महत्त्व आहे.यासह क्रीडा क्षेत्रात करिअर च्या अनेक संधी असून यातील विविध पैलू मध्ये आपण भविष्य घडवू शकता असे प्रतिपादन राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू तथा क्रीडा पत्रकार महेश पाळणे यांनी केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयात क्रीडा आणि व्यावसायिक संधी यावर राष्ट्रीय कार्यशाळा झाली.यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले नीट,जेईई व एमपीएससी च्या जमान्यात क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत,त्यासाठी खेळात मेहनत आवश्यक आहे. 5 टक्के आरक्षणातून खेळाडूंना थेट नियुक्ती मिळते. यासह कोच, ट्रेनर, क्रीडा विश्लेषक, क्रीडा मानसशास्त्र, फिजियो, क्रीडा आहारतज्ज्ञ, क्रीडा मार्केटिंग, डेटा सायन्स, क्रीडा इव्हेंट मॅनेजमेंट, क्रीडा उपकरण डिझायनर, क्रीडा व्यवस्थापन यासह अनेक संधी करिअर साठी असल्याचे सांगून अनेक लीग च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments