एल टी एन न्यूज च्या चौथा वर्धापन दिनानिमित्त "वर्धापन दिन विशेषांक" प्रकाशन व सर्पमित्रांना "स्नेक रेस्क्यु किट" वितरण सोहळा संपन्न
लातूर : एल टी एन न्यूज चॅनलच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त "वर्धापन दिन विशेषांक" प्रकाशन व सर्प मित्रांना "स्नेक रेस्क्यू किट" चे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता डॉ. अण्णाभाऊ साठे चौक गंजगोलाई लातूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व केंद्रीय अधिकारी गणेश चौधरी अग्निशमन दल मनपा लातूर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सर्पमित्र शासनाच्या कोणत्याही मानधनाशिवाय अथवा कोणत्याही देणगीशिवाय साप पकडण्याचे जोखीमीचे काम करत असतात गेली अनेक वर्षापासून सर्प मित्रांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत त्यावर शासन गांभीर्याने विचार करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ही बाब विचारात घेऊन सर्पमित्र विकास संघटन चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एल टी न्यूज चे संपादक नेताजी जाधव यांनी दुसऱ्या वर्धापन दिनी राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन व चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील 30 सर्पमित्रांना "स्नेक रेस्क्यू किट" चे वाटप करण्याचा संकल्प आज पूर्ण केला आहे. या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील, मोटार वाहन निरीक्षक श्री सुरेश माळी प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर, वन परिमंडळ अधिकारी श्री निलेश बिराजदार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री धनंजय पोटे बोलताना सर्प मित्रांचे काम अतिशय कौतुकास्पद असून त्यांना फ्रंट लाईन वर्कर्स दर्जा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लागणारा पाठपुरावा आम्ही करत आहोत अशी ग्वाही दिली. सर्पमित्राने साप पकडण्याचे काम करत असताना काळजीपूर्वक करावे असा सल्लाही दिला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी रघुनाथ बनसोडे यांनी एल टी एन न्यूज च्या कामाचा चढता आलेखाचे कौतुक केले. माजी नगरसेवक चंद्रकांत दादा चिकटे, मोहन माने, लक्ष्मण कांबळे, मुख्याध्यापक कवी इस्माईल शेख, उषाताई आडे, लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ, बंटी गायकवाड, ॲड राहुल कांबळे, भिमाशंकर गाढवे, सिद्धार्थ चव्हाण, अन्वर पटेल, नितिन लोखंडे, अजमेर शेख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना एलटीएन न्युजचे संपादक नेताजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सुशीलकुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आमदार अमित विलासराव देशमुख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विलास को-ऑपरेटिव्ह बँक,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर पोलीस प्रशासन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर, वनविभाग लातूर, स्टार्क क्लासेस, लोकनायक संघटना, डॉ अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समिती, महाराष्ट्र युवाशक्ती संघटना, ब्ल्यू पॅंथर संघटना, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवसेना महानगरप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, वीर योद्धा संघटना, एबीएस क्रांती फोर्स, शहीद अहमद खान पठाण कृती समिती, राजा साहब हॉटेल, गुलशन हॉटेल, पञकार नितीन बनसोडे, लिंबराज पन्हाळकर, प्रकाश कंकाळ, के वाय पटवेकर, शिवाजी कांबळे, रवी बीजलवाड, धनराज वाघमारे, नाना कांबळे, बालाप्रसाद काबरा, सुनिल गवळी, शरद पवार लोकनायक संघटनेचे किसन कदम, सरफराज सय्यद, प्रीती माऊली लातूरकर, समाधान उदार, रवी सुळे यांचे योगदान लाभले.
0 Comments