मोहोळ येथील डी. व्ही. गायकवाड प्राथमिक शाळेत अशिहरा कराटे इंडिया - AKI च्या वतीने यशस्वी बेल्ट परीक्षा
सोलापूर : शिक्षण मित्र डी. व्ही. गायकवाड प्राथमिक शाळा, मोहोळ येथे अशिहारा कराटे इंडिया (AKI) यांच्या वतीने कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशस्वीरीत्या उत्तीर्णता मिळवली.
या परीक्षेत येलो बेल्टसाठी तन्वी होनमाने, आरुषी दोषी, किरण लवटे, योगिता आदलिंगे, आरुषी आदलिंगे, ईश्वरी आदलिंगे, तनिष्का फडतरे, ईश्वरी फडतरे, यश आदलिंगे, शिवराज बाउलदास, विराज कांबळे, रुद्र पवार, सार्थक थिटे व आदित्य फडतरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ग्रीन बेल्ट परीक्षेत कबीर आदलिंगे, स्वरांजली काकडे, उत्त्कर्षा कारंडे, संचिता महामुनी, उत्कर्ष अंडगे, तनवी गुरव, जानवी गुरव, प्रांजली गावडे व तेजस्विनी सुतार यांनी यश संपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. महानंदा अंडगे होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी आदलिंगे, दिनेश आदलिंगे, सोमना गुरव, रमेश जगताप, थिटे, अगम दोषी व प्रशांत बाउलदास उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अशिहारा कराटे इंडियाच्या अधिकृत प्रमाणपत्रांसह बेल्ट प्रदान करण्यात आले.
या परीक्षेचे मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर यांनी काम पाहिले, तर महिला सहपरीक्षक म्हणून सौ. सुजाता (माळी) आदलिंगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शनही सौ. सुजाता आदलिंगे यांनी केले. कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सौ. महानंदा अंडगे यांनी मुलींनी कराटे प्रशिक्षणात घेतलेली सक्रियता ही गौरवास्पद असल्याचे सांगून स्त्री-शक्तीच्या सबलीकरणासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “कराटे प्रशिक्षण मुलींना आत्मविश्वास, सुरक्षा आणि शारीरिक क्षमतांचे बळ देते. शाळेतूनच अशा संस्कारांची रुजवात होणे ही काळाची गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी कराटेचे महत्त्व अधोरेखित केले.
0 Comments