कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची धावाधाव; मांज्यात गुरफटलेल्या कावळ्याची तब्बल एक तासाने सुटका
लातूर : शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालय गांधी चौक येथील आवारात नायलॉनच्या मांजा दोऱ्यात गुरफटून झाडावर लटकत असलेल्या जिवंत कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची धावाधाव झाली असून तब्बल एक तास कावळ्याचे बचाव कार्य सुरू होते.
शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाच्या समोर असलेल्या एका झाडावर कावळा जोरजोरात ओरडत असल्याचे चित्र शिवराम कांबळे यांच्या नजरेस पडले त्यांनी कावळ्यांचा एवढा आवाज का होत आहे याचे निरीक्षण केल्यावर नायलॉनच्या मांज्या दोऱ्यामध्ये कावळा गुरफटला गेला आहे आणि तो झाडावर लटकत असल्याचे चित्र लक्षात आले त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल होत नायलॉनच्या मांज्या दोऱ्यात गुरुपटलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू केले पण कावळ्यांचा गोंधळ त्यांना काय जमू देत नव्हता. शेवटी अथक प्रयत्नानंतर कावळ्याला खाली उतरवण्यात आले व त्याच्या सभोवताली पंखाला गुरफटलेल्या नायलॉनचा मांज्या दोरा काढण्यात आला. तो खूप तहानलेला असल्यामुळे त्याला पाणी पाजून अन्न दिले. त्याच्या पंखाला इजा झाली असून सध्या तो पक्षीमित्र मेहबूब यांच्या कडे निगराणीखाली आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
0 Comments