Latest News

6/recent/ticker-posts

गावठी पिस्टल व १७ काडतुसे जप्त; १,९३,५०० रुपयांचा मुद्देमालासह आरोपी अटकेत

गावठी पिस्टल व १७ काडतुसे जप्त; १,९३,५०० रुपयांचा मुद्देमालासह आरोपी अटकेत

लातूर : दि. २७ ऑगस्ट आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरु आहे. त्याच मोहिमेअंतर्गत विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमाला पोलीसांनी अटक करून तब्बल रु. १,९३,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नवीन रेणापूर नाका – डी मार्ट रोडवर एक इसम गावठी पिस्टलसह थांबलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला असता, स्कुटी (क्र. MH 24 AN 3240) डिग्गीतून एक गावठी पिस्टल आढळून आले. तपासादरम्यान सदर इसमाची ओळख अलोक विश्वनाथ चौधरी (वय ३६, रा. आंबा हनुमान मंदिराजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर) अशी पटली. पोलीसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व १७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत केला. चौकशीअंती सदर शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन एकूण रु. १,९३,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पु.उ.नि. सचिन रेडेकर पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी(लातूर शहर) समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.उ.नि. सचिन रेडेकर, अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, रणवीर देशमुख, गणेश यादव, धैर्यशील मुळे, सचिन राठोड आणि आनंद हल्लाळे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments