मुंबई आंदोलनासाठी निटूर येथील मराठा बांधवांचे प्रस्थान
निटूर : (ता. निलंगा) मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले. अंतरवली सराटी गावातून प्रस्थान करताच मराठा बांधवांनी घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला. “एक मराठा लाख मराठा” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आगामी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी निलंगा तालुक्यातील निटूरसह परिसरातील विविध गावांतील मराठा बांधव संध्याकाळी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोर्चात विठ्ठलराव सोमवंशी, विजयकुमार जाधव, प्रशांत पाटील, शरद सोमवंशी, युवराज सोमवंशी, सूर्यकांत निटुरे, खंडू घाटगे, अमर निटुरे, वैजनाथ बुरकुले, योगेश जाधव, ऋषिकेश सोमवंशी, कुणाल पाटील, बिभीशन सोमवंशी, अभिषेक सोमवंशी, आशिष पाटील, आदित्य सोमवंशी, मोहन निटुरे, ओमकार पाटील, पिंटू निटुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चाच्या प्रस्थानावेळी गावकऱ्यांनी सहभागी कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीच्या वातावरणात कार्यकर्त्यांना मुंबई आंदोलनासाठी निरोप देण्यात आला.
0 Comments