Latest News

6/recent/ticker-posts

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. मजहर फकिरपाशा यांची नियुक्ती

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. मजहर फकिरपाशा यांची नियुक्ती


लातूर : पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच संपर्कप्रमुख माजी आमदार रोहीदासजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार अ‍ॅड. मजहर फकिरपाशा रोख यांची औसा-निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संतोष ज्ञानोबा सोमवंशी यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की, अ‍ॅड. मजहर फकिरपाशा यांनी प्रामाणिक, कष्टाळू आणि राष्ट्रहितासाठी कार्य करून शिवसैनिकांचा विश्वास जपावा. तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अ‍ॅड. मजहर फकिरपाशा हे व्यवसायाने वकिल असून, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. युवक मार्गदर्शन, विधी सहाय्य अभियान तसेच शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सौम्य स्वभाव, कार्यनिष्ठा आणि संघटनकौशल्यामुळे त्यांचा तरुण वर्गामध्ये चांगला प्रभाव आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अ‍ॅड. मजहर फकिरपाशा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments