Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या पावसामुळे सुट्टी- जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या पावसामुळे सुट्टी- जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

लातूर : दि. 26 - हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी उद्या, 27 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, सरकारी व खाजगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग तसेच आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने केलेली ही घोषणा पालकांनी व शैक्षणिक संस्थांनी त्वरेने लक्षात घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments