नळेगावच्या खेळाडूंची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
लातूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 सप्टेंबर 2025 रोजी बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत नळेगाव येथील कै. नर्सिंगराव चव्हाण विद्यालयाच्या कराटेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी सादर करून विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी नांदेड येथे आपली निवड निश्चित केली आहे.
17 वर्ष वयोगटांमध्ये वेदांत दिलीप क्षीरसागर 37 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला तर पृथ्वीराज अनिल चव्हाण यांनी 70 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांतराव चव्हाण, उपाध्यक्ष संभाजीराव भालेकर, सचिव सविताताई चव्हाण, कोषाध्यक्ष जयरामजी गट्टेवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण, अशिहरा कराटे असोसिएशन, लातूरचे सचिव - के वाय पटवेकर, तोंडारे, वाघमारे, कदम, गणेश माचवे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूला संतोष तेलंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments