Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

लातूर : दि. 28 - चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून पिकांचे नुकसान, चाऱ्याची उपलब्धता याविषयी माहिती घेतली. 

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा शिवारातही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments