Latest News

6/recent/ticker-posts

शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यात पीक नुकसान पाहणी दौरा; अशोकराव पाटील निलंगेकर व खासदार डॉ. शिवाजीराव काळगे शेतकऱ्यांच्या अडचणीत धावले

शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यात पीक नुकसान पाहणी दौरा; अशोकराव पाटील निलंगेकर व खासदार डॉ. शिवाजीराव काळगे शेतकऱ्यांच्या अडचणीत धावले

लातूर :  दि. ३ सप्टेंबर रोजी (बुधवार) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर तथा खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

या दौऱ्यात मांजरा नदीपात्र व डोंगरगाव बंधारेज परिसरासह डोंगरगाव, हालकी, उजेड, ढोबळेवाडी, मुगाव, निटुर, मसलगा या गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी कर्मयोगी, स्व. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची आठवण काढत, “त्यांच्या प्रयत्नांमुळे आमची शेती वाचली. त्यावेळेस आमच्या जमिनी पाण्याखाली जाण्यापासून त्यांनी रोखल्या,” असे सांगताना अनेक शेतकरी गहिवरून गेले.

दौर्‍यास सुरेंद्र धुमाळ, नगरसेवक सुधीर लखनगावे, व्यंकटराव शिंदे, सरपंच रमेश मोगरगे, माजी सरपंच गोविंद काटे, चेअरमन रमेश मोगरगे, धोडिंराम ढोक, अशोकराव भदरगे, पंडितराव भदरगे, विठ्ठलराव पाटील वांजरखेडकर, श्रीधर झरकर, द्यानेश्वर पिंड मसलगेकर, चेअरमन नरसिंग ढाकणे, बालाजी पाटील ताजपुरकर, डॉ. कालिदास शेंदकर, सुनिल झरकर, माजी सरपंच ओम पाटील, सतिश कोळेकर, कुमार मोगरगे, राम झरकर, बापुसाहेब पौळ, बाळु मोगरगे, आबासाहेब देशमुख, ओमप्रकाश पाटील, दिनकर सावंत, विठ्ठल झरकर आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मान्यवरांना सादर करून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती केली.

Post a Comment

0 Comments