लातूर, चाकूर तालुक्यात अशिहारा कराटे इंडिया (AKI) तर्फे यशस्वी बेल्ट परीक्षा
लातूर : विश्वशांती धाम महादेव मंदिर, चाकूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसला येथे अशिहारा कराटे इंडिया (AKI) तर्फे कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन केले. चाकूर तालुक्यातील नायगाव येथील येलो बेल्ट परीक्षेत संभा दिलीप मोगले, ओम अश्रुबा गायकवाड, दिव्या हरीचंद्र आटखिळे, प्रतीक्षा विक्रम कांबळे, आरती अर्जुन मोगले, प्राजक्ता प्रकाश शिरसाठे, सृष्टी गंगाधर मोगले, समीक्षा गंगाधर मोगले यांनी उत्तीर्णता मिळवली.
मसला येथील ग्रीन-1 बेल्ट परीक्षेत सृष्टी अश्रुबा पाखरे, वेदांत विष्णू निलंगे, मनोज मुक्तेश्वर वांगस्कर, रुद्र दयानंद धुमाळ, किरण गौरीशंकर धुमाळ, संस्कार गौरीशंकर धुमाळ, सुमित महारुद्र लोखंडे, हरीश दयानंद धुमाळ, महेश शिवहार धुमाळ, केदार उमाकांत निलंगे यांनी चमकदार यश संपादन केले. चाकूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतीचे माजी सरपंच गंगाधर अण्णा केराळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मसला येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Adv. कलीम मणियार होते. त्यांनी कराटेसारख्या शिस्तबद्ध क्रीडेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो असे नमूद केले. या वेळी विद्यार्थ्यांना अशिहारा कराटे इंडियाचे अधिकृत प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले. परीक्षेचे मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर, सहपरीक्षक म्हणून चाकूर येथे युसुफ शेख व मसला येथे बालाजी राजमाने यांनी काम पाहिले.
0 Comments