समाजात आदर्श पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात – माजी आ. मनोहर पटवारी
देवणी : समाजात आदर्श पिढी निर्माण करण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते. आज समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात. सेवानिवृत्तीनंतर कार्य संपले असे न मानता, आयुष्यभर समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन माजी आमदार मनोहर पटवारी यांनी केले. ते दि. ६ सप्टेंबर रोजी प्रियदर्शनी प्राथमिक विद्यामंदिर जवळगा येथील शिक्षक पांडुरंग श्रीनिवास पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे सचिव इंजि. अनिल मुळे व शाळेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामलिंग मुळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग श्रीनिवास पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसंच महादेव विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य रामलिंग मुळे, नूतन प्राचार्य अनिल गाडे, शांतिनिकेतन विद्यालय मुळकी येथील मुख्याध्यापक चंद्रकांत बंडगर व संत भगवान विद्यालय धामणगाव येथील मुख्याध्यापक रविकिरण साकोळकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव इंजि. अनिल मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, समाजसेवक लहुजी गंगापुरे, पांडुरंग हुडे, मुख्याध्यापक उद्धव तवडे, अरुण मुळे, सुनील मुळे, इंद्रजीत पाटील, हाणमंत बिराजदार, रमेश वाघ, पुंडलिक बिरादार, विजयकुमार पाटील, संजीव रेड्डी, शिवाजी पाटील, रविंद्र इगे, सुरज मुळे, शेषेराव पाटील, शिवाजी बिरादार, रतन बिरादार, गंगाधर धानुरे, नागेश बिरादार, गंगाधर तोंडारे, किशोर बिरादार, राजकुमार मुळे, सुरज पाटील, इब्राहीम सय्यद, अजमोदिन टकारे, सुभाष पारशेट्टे, रंगलाल धुत आदी मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव इंजि. अनिल मुळे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्य रामलिंग मुळे, प्राचार्य रविकिरण साकोळकर, प्राचार्य अनिल गाडे व मुख्याध्यापक चंद्रकांत बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमातील मान्यवर व पाहुण्यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक उद्धव तवडे यांनी मानले.
0 Comments