Latest News

6/recent/ticker-posts

काळेगावात ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिर, 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान

काळेगावात ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिर, 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अहमदपूर : तालुका काळेगाव येथे ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी (दि. ५) आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 42 रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान करून हा उत्सव साजरा केला. 

सुलेमानीया ग्रुप काळेगाव व शौर्य ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद, काळेगाव येथे हे शिबीर घेण्यात आले. या वेळी नसीबोदीन जागीरदार, मजीद जागीरदार, रज्जाक बापु देशमुख, झहीरमिया देशमुख, अकबर सय्यद, सय्यद उस्मान, असगर, शाकेर सय्यद, शेख हैदर, सय्यद मसूद, हाफिज अ.लतीफ साब, इस्ताख सय्यद, खदीर सय्यद, शाबोद्दीन सय्यद, उबेद जागीरदार, अर्शद, फैसल, लुक्मान देशमुख, हूजेफ जागीरदार, रियाझ, उमर जागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तसंकलनाची जबाबदारी शौर्य ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या उपक्रमाला स्थानिक समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ईद-ए-मिलाद साजरी करण्याचा एक वेगळा सामाजिक संदेश दिला.

Post a Comment

0 Comments