मा. प्राचार्य तथा सरपंच रामलिंग मुळे यांना ‘आयकॉन ऑफ मराठवाडा २०२५’ पुरस्कार
लातूर : १५ सप्टेंबर – शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, सांस्कृतिक, विज्ञान आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मा. प्राचार्य तथा मा. सरपंच रामलिंग मुळे यांना ‘आयकॉन ऑफ मराठवाडा २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा नवभारत-नवराष्ट्र तर्फे लातूर येथील एका हॉटेल मध्ये उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा आमदार अभिमन्यू पवार तसेच नवभारत-नवराष्ट्रचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रामलिंग मुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


0 Comments