Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या कन्यांची जिल्हास्तरीय तायक्वांन्दो स्पर्धेत विजयी झळाळी

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या कन्यांची जिल्हास्तरीय तायक्वांन्दो स्पर्धेत विजयी झळाळी

अहमदपूर : १५ सप्टेंबर – जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव (ता. अहमदपूर) येथील दोन कन्यांनी जिल्हास्तरीय तायक्वांन्दो स्पर्धेत चमकदार यश संपादन करून शाळेचा लौकिक वाढवला आहे.

जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील ३२ ते ४० किलो वजनगटात कु. क्रांती माधव कासनाळे आणि कु. पल्लवी चंद्रकांत केंद्रे यांनी अचूक तंत्र आणि दमदार खेळाचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे शाळेचा सन्मान उंचावला असून खेळाडूंवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, शाळेच्या सीईओ श्रीमती रितू मद्देवा-माले, प्राचार्या जेबाबेरला नादार तसेच शाळेचे समन्वयक संगमेश्वर ढगे, क्रीडा विभाग प्रमुख राहुल अडसूळ, इस्माईल शेख यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक प्रशिक्षणामुळेच खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपली छाप उमटवली असल्याचे मत शालेय व्यवस्थापनाने व्यक्त केले. क्रांती व पल्लवीच्या या विजयामुळे शालेय परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून आगामी विभागीय स्पर्धेतही त्यांनी असाच लौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा सर्वांकडून दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments