Latest News

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय मास्टर्स व्हॉलीबॉल लीगसाठी महेश पाळणे यांची भारतीय संघात निवड

आंतरराष्ट्रीय मास्टर्स व्हॉलीबॉल लीगसाठी महेश पाळणे यांची भारतीय संघात निवड


दुबईत १८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ४५ वर्षांवरील स्पर्धेत सहभाग

लातूर : दुबई येथील इनडोअर स्टेडियममध्ये १८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचे खेळाडू महेश शिवहर पाळणे यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

या मास्टर्स स्पर्धेत भारतासह स्पेन, पोलंड, यूएई, पाकिस्तान, फिलिपाईन्स, नेपाळ तसेच युरोपियन युनियनच्या संघांचा समावेश आहे. पुणे येथे पार पडलेल्या मास्टर्स व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर पाळणे यांची निवड करण्यात आली. या भारतीय संघात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक व दिल्लीच्या खेळाडूंचा समावेश आहे.

महेश पाळणे यांनी यापूर्वी अनेकदा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत उठून दिसणारी कामगिरी केली आहे. त्यांनी राज्य तसेच नांदेड विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविले असून, ज्युनियर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरातही सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य संघाचे आणि नांदेड विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक तसेच निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पाळणे यांच्या या यशाचे कौतुक जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, रामानुज रांदड, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मोईजभाई शेख, विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी, जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, मुख्याध्यापक संतोष देशमुख, महाराष्ट्र क्लबचे सदस्य उमाशंकर पाळणे, पत्रकार के वाय पटवेकर, सुरेश काळे, प्रवीण तावशिकर, विजय सोनवणे, कृष्णा पोतदार, ललित जोशी, पीएसआय विश्वजीत कासले, डॉ. निलेश पौळ, नंदू भोसले, सद्दाम शेख, विठ्ठल कवरे यांच्यासह क्रीडाप्रेमींनी व व्हॉलीबॉलपटूंनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments