इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकन कराटे असोसिएशन लातूरचा शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक यश
लातूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले. या स्पर्धेत इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकन कराटे असोसिएशन, लातूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदकांवर ठसा उमटवला.
विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर असोसिएशनचे नाव उज्ज्वल केले. विजेत्या खेळाडूंची नावे 14 वर्षे वयोगट प्रथम : वैष्णवी जाधव (-50 किग्रॅ), हर्ष आकडे (-30 किग्रॅ) द्वितीय : कुशल कटारे (-30 किग्रॅ), अविष्कार केळे, अवधूत केळे तृतीय : शाबास सय्यद (-35 किग्रॅ), रुद्राक्ष सोमवंशी (-45 किग्रॅ), स्वैराली दुरुगकर 17 वर्षे वयोगट प्रथम : प्रगती उद्धव जाधव (-64 किग्रॅ) द्वितीय : समर्थ डोंगरे (-40 किग्रॅ), शिवदर्शन मुदगले (-50 किग्रॅ), कार्तिक जाधव (-54 किग्रॅ) तृतीय : गणेश गवळी (-54 किग्रॅ) या सर्व विजेत्या खेळाडूंना इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक शेख आजमीर तसेच प्रशिक्षक रिहान शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विशद कांबळे, आरती कस्तुरे, रेश्मा सूर्यवंशी, मुजाहिद सय्यद तसेच पालकवर्ग व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 Comments