धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आनंदनगर येथे ध्वजारोहण
लातूर : येथील आनंद नगर येथील समाज मंदिरावर ६९ वा धम्म चक्र प्रवर्तक दिनानिमित्त गुप्त वार्ता शाखेच्या पोलीस निरीक्षक माधवी मस्के यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर याच परिसरातील तथागत चौक येथील ध्वजारोहण सविता सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले . या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिराचंद सितापुरे यांनी केले तर आभार ॲड. धम्मदिप बलांडे यांनी मानले.
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आनंद नगर ते आंबेडकर पार्क अशी पदयात्रा काढण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच पंचशील ध्वजाचा जयघोष करत ही पदयात्रा आंबेडकर चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक, गंज गोलाई मार्गै पुढे महात्मा गांधी चौक येथून आंबेडकर पार्क येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी त्रीसरण पंचशील आणि २२ प्रतीज्ञाचे वाचन करण्यात आले. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मंडळाचे राहुल डुमणे, प्रा. हिराचंद सितापुरे, ॲड.धम्मदीप बलांडे, प्रताप कांबळे, बाबा गायकवाड, डॉ. सितम सोनवणे, लाला सुरवसे, ॲड.संजय सितापुरे, दिलीप सुरवसे, दत्तू गवळी, डॉक्टर गणेश कांबळे, ॲड .रुपेश गायकवाड, लाला गायकवाड, बंटी कांबळे, रघुनाथ कांबळे, तुकाराम वाघमारे, प्रेम गायकवाड, नारायण सूर्यवंशी,आनंद नगर महिला मंडळाच्या जमुनाताई गायकवाड, विमलताई डुमणे, गंगुबाई गायकवाड, जयश्री गायकवाड, वर्षा डुमणे, मिताली सीतापुर, शोभा मुडबीकर, सुभद्रा इंगळे, सुकुमारबाई वाघमारे, आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.


0 Comments