Latest News

6/recent/ticker-posts

शौर्य मार्शल आर्ट्स अकॅडमीने किकबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत मिळवली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके

शौर्य मार्शल आर्ट्स अकॅडमीने किकबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत मिळवली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके

पुणे : ( क्रीडा प्रतिनिधी/ रोहिणी बनसोडे ) दि. 20 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान राजाराम भिकू पठारे क्रीडा संकुल खराडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत शौर्य मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी ‘डबल इव्हेंट’ मध्ये म्हणजेच पॉईंट फायट, लाइट कॉन्टॅक्ट आणि किक लाइट या प्रकारात सहभाग नोंदवून तीन मिनिटांच्या राऊंडमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या स्पर्धेत श्वेता देशमुख हिने पॉईंट फायट या प्रकारात सुवर्ण, तर लाइट कॉन्टॅक्ट प्रकारात रौप्य पदक पटकावले. ज्ञानेश्वरी थोरात हिने पॉईंट फायटमध्ये रौप्य आणि लाइट कॉन्टॅक्टमध्ये सुवर्ण पदक मिळवले. जान्हवी साबळे हिने लाइट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य तर किक लाइट प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. निधी भोसले हिने पॉईंट फायट व लाइट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारात कांस्य पदक मिळवून अकॅडमीच्या यशात भर घातली. गौरव शेलार याने पॉईंट फायटमध्ये रौप्य व लाइट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक पटकावले. सार्थक मळेकर याने पॉईंट फायटमध्ये रौप्य, तर लाइट कॉन्टॅक्टमध्ये सुवर्णपदक मिळवून आपली छाप पाडली. सर्व यशस्वी खेळाडूंना शीतल (शंकर) साबळे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे विजयाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments