दर्शवेळा अमावस्यानिमित्त लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी
लातूर : जिल्ह्यासाठी 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 20 जानेवारी, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे.
लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी लागू राहील.


0 Comments