Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिवच्या संस्कृती कपाळेचे यश,कांस्यपदकाची कमाई

राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिवच्या संस्कृती कपाळेचे यश,कांस्यपदकाची कमाई


धाराशिव : इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे सुरू असलेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिवची कन्या संस्कृती कपाळे हिने उत्कृष्ठ खेळ सादर करत कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीची माहिती धाराशिव जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव राजेश महाजन यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ३२ किलो वजनगटात संस्कृती कपाळे हिने छत्तीसगड, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंवर एकतर्फी मात करत उल्लेखनीय विजय मिळवला. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर संस्कृतीने राष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

संस्कृतीच्या या यशाबद्दल धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, भुजंगराव नाईकवाडी, अक्षय बिराजदार, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, सहसचिव सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत आणि रवी जाधव यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. संस्कृती कपाळे हिला प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे, माधव महाजन, सुमेध चिलवंत आणि स्मिता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत अभिमानाची भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments