आठवी लातूर जिल्हा फुनाकोशी कराटे ओपन चॅम्पियनशिप यशस्वीरीत्या संपन्न
लातूर : येथील खाडगाव चौकातील टी. जी. फंक्शन हॉल येथे आठवी लातूर डिस्ट्रिक्ट फुनाकोशी कराटे ओपन चॅम्पियनशिप अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडली. ही स्पर्धा इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून रवीकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दत्ता कदम, Adv. रामेश्वर सागरे, सुरेखा गिरी, अजित ढोले व सुजित गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजय गायकवाड, प्रवीणकुमार, रहीम शेख तसेच विशद कांबळे यांची उपस्थिती लाभली. पंच म्हणून आतिफ पटेल, मुजाहिद सय्यद, रेहान शेख, आरती कस्तुरे, प्रगती जाधव, रेश्मा सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, राणी गडराव, मयुरी चाफेकर, शिवदर्शन मुदगळे, आदित्य कांबळे व कार्तिक जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध कराटे संघटनांतील खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी सादर केली. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे व करंडक देऊन गौरविण्यात आले. कराटे या पारंपरिक खेळाविषयी लातूरकरांमध्ये वाढती आवड आणि शिस्तीची जाणीव या स्पर्धेतून दिसून आली.


0 Comments