राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना
पुणे :( क्रीडा प्रतिनिधी /रोहिणी बनसोडे ) नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियमवर सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित 69 वी राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा 14, 17 व 19 वर्षाखालील मुलांचा संघ रवाना झाला आहे. या खेळाडूंना गणवेश किटचे वाटप करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुल आणि सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय शालेय जलतरण डायविंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमधून राष्ट्रीय पातळीसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे दिनांक 23 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय निवड संघ दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना झाला. संघ रवाना होण्यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी संघाला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका क्रीडा अधिकारी योगेश खोब्रागडे, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, क्रीडा मार्गदर्शक बालाजी केंद्रे, नीलकंठ आखाडे तसेच संघ व्यवस्थापक तलवाडे, म्हेत्रे, भालेराव व कुरपे आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments