क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये SQAAF मूल्यांकन
अहमदपूर : तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये SQAAF (School Quality Assessment and Accreditation Framework) या शालेय गुणवत्ता मूल्यमापन प्रकल्पाअंतर्गत बाह्य मूल्यांकन प्रक्रिया उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या मूल्यांकनासाठी आलेल्या पथकात एस. बी. कासार (केंद्रप्रमुख व पथकप्रमुख), के. आर. मुंडकर (केंद्रीय मुख्याध्यापक, शिरूर) आणि माधव मठवाड (मुख्याध्यापक, मोरेवाडी) यांचा समावेश होता. पथकाने शाळेतील सर्व शैक्षणिक प्रक्रिया, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाढ, शैक्षणिक व प्रशासकीय दस्तऐवज, विभागनिहाय रचना, तसेच भौतिक सुविधा यांचे सूक्ष्म निरीक्षण केले.
मूल्यांकनाच्या या भेटीदरम्यान मान्यवरांचा शाळेच्या वतीने प्राचार्या जेबाबेरला नादार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पथकातील सदस्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रगतीविषयी चौकशी केली आणि भावी शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेस शाळेचे समन्वयक संगमेश्वर ढगे, लिपिक सूर्यकांत गोरे आणि धनंजय राचमाले यांचे प्रभावी सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्गानेही संपूर्ण समर्पणाने आपली भूमिका बजावली. या निमित्ताने प्राचार्या जेबाबेरला नादार यांनी म्हटले की, “SQAAF मूल्यांकनामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे विश्लेषण करून सुधारणा करण्याची संधी मिळते.


0 Comments