पुण्यात उत्साह, शिस्त आणि दमदार लढतींनी रंगली नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप
पुणे : नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ चा भव्य शुभारंभ खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात झाला. २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवराज घुले, माजी सरपंच पुरुषोत्तम धारवडकर, उपसरपंच सुमित घुले आणि बाळासाहेब घुले उपस्थित होते.
या वेळी नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब घुले, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा चॅम्पियनशिप २०२५ चे चेअरमन अतुल घुले तसेच ऑर्गनायझिंग सेक्रेटरी नितीन मुळे उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी संतोष खैरनार, जयदेव म्हमाने, के. वाय. पटवेकर, कैलास टीकोळे, मिलिंद श्रीराम, राजू दवणे, भारत कोकाटे, विनायक पोटे, हिना राठोड आणि श्याम पोतदार यांनीही उपस्थिती दर्शविली.
स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीत व पारंपरिक भरतनाट्यम नृत्याने झाली, ज्यामुळे उद्घाटन सोहळ्यास सांस्कृतिक छटा लाभली. देशभरातील केरळ, मेघालय, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, आसाम, दिल्ली व हैदराबाद येथून ५०० हून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सांघिक विजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले, तर केरळ आणि तेलंगणा यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले. उत्कृष्ट संघ चषक उत्तर प्रदेशला प्रदान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ बापूसाहेब घुले, सी. ए. तांबोळी आणि अतुल घुले यांच्या हस्ते पार पडला. चॅम्पियनशिपचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ओंकार किर्वे, पल्लवी किर्वे, श्रद्धा शिनगारे-नवले, प्रियांका बडेकर, श्रुती घोडके, वैशाली घोडके, रोहन कांबळे, श्रवण घोडके, विवेक मोहिते, रवी जाधव, चिन्मय गुरव, दिग्विजय बिचितकर आणि वेदिका उकरंडे यांनी परिश्रम घेतले.



0 Comments