Latest News

6/recent/ticker-posts

'खेलो इंडिया' विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रा. डॉ. गोपाळ मोघे यांची पथक प्रमुख म्हणून निवड

'खेलो इंडिया' विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रा. डॉ. गोपाळ मोघे यांची पथक प्रमुख म्हणून निवड


लातूर : जयपूर, राजस्थान राज्यातील जयपूर येथे होत असलेल्या 'खेलो इंडिया' विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 साठी निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. गोपाळ मोघे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पथक प्रमुखपदी निवड झाली आहे. ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत जयपूर, भरतपूर, बिकानेर आणि कोटा येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार असून, या उद्घाटन सोहळ्याला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भारतीय सरकारचे मानव संसाधन विकास मंत्री मनसुख मांडवीया तसेच ऑलिंपिक पदकविजेते आणि राजस्थानचे क्रीडामंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुस्ती, धनुर्विद्या, तलवारबाजी, मल्लखांब आणि वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये विद्यार्थी पात्र ठरले असून, त्या सर्व पथकांचे नेतृत्व प्रा. डॉ. गोपाळ मोघे करणार आहेत. यापूर्वी उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी केंद्र शासनाने त्यांची पंच म्हणून निवड केली होती. ते स्वतः राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून, नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थान (एनआयएस), पटियाला, पंजाब येथून एक वर्षीय जलतरण प्रशिक्षक पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. प्रा. मोघे यांच्या या निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, क्रीडा संचालक प्रा. डॉ. भास्कर माने, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पी. एन. देशमुख, विद्यमान व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड व डॉ. डी. एन. मोरे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments