Latest News

6/recent/ticker-posts

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या घरास स्टीकर लावणे बंधनकारक

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या घरास स्टीकर लावणे बंधनकारक



लातूर:(प्रतिनिधी)दि.२२ जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील ज्या नागरिकांना घरात विलगीकरण करावयाचे आहे अशा व्यक्तींच्या दोन्ही हातावर Home Quarantine असा शिक्का मारण्यात येत असून त्याचबरोबर ज्या घरात विलगीकरण करण्यात येणार आहे अशा घरातील दर्शनी भागावर विहित नमुन्यातील स्टीकर तेथील आरोग्य संत्रणेशी समन्वय साधून स्थानिक ग्रामपंचायत/ नगरपंचायत यांचे मार्फत (लातूर शहरात आरोग्य विभाग लातूर शहरन म.न.पा. यांचेमार्फत ) लावणेचे आदेश जारी केले आहेत.


 या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१, ५५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे ही आदेशात नमुद केले आहे.


Post a Comment

0 Comments