निलंगा विधानसभा क्षेत्रातील सर्व बाजार सकाळी ९ ते ५ वा पर्यन्त चालु राहणार
निलंगा/ मोहन क्षिरसागर
महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन काळात नवीन अटी शर्थीसह व्यापऱ्यासह नागरिकांना मोठी सूट दिली आहे.ज्याचा शासन आदेश क्रमांक DMU/2020/CR92/DisM-,dated19may2020 प्रमाणे दिनांक २२ मे २०२० पासून सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यात सर्व व्ययसायी व्यापाऱ्यांना सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ९.०० तेसायंकाळी ५.०० पर्यन्त दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे.याच बरोबर विशेषतः नॉन रेड झोन मध्ये ग्रामीण व शहरी भागातील हेअर कटिंग सलून यांना ही परवानगी देण्यात आली आहे.सदर चा शासन आदेश हा रेड झोन व नॉन रेड झोन साठी वेगवेगळ्या अटी शर्थीसह संपूर्ण राज्याला लागू आहे.
0 Comments