Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू

 लातूर जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू


सुरक्षा नियमांची काटेकोर अमंलबजावणी करून जनतेने प्रवास करावा-पालकमंत्री अमित देशमुख


लातूर:(प्रतिनिधी) २२ मे लातूर जिल्हातर्गत महत्वाच्या मार्गावर पहिल्या टप्प्यातील एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेने कोविड१९ व लॉकडाऊनच्या संदर्भाने सर्व सुरक्षा नियमाचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.


 या संदर्भाने बोलतांना पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, कोविड-१९ विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात सदया लॉकडाऊन्‍ सुरू आहे. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात कमी जोखीम असलेल्या भागात दैनदिन जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार पासून लातूर जिल्हा अंतर्गत प्रमुख मार्गावर पहिल्या टप्यात ४० बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस जिल्हयाचे ठिकाण ते तालुक्याचे ठिकाण आणि तालुक्याचे ठिकाण ते तालुक्याचे ठिकाण या मार्गावर धावणार आहेत.जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करतांना एसटी महामंडळाने सुरक्षेच्या सर्व व्यवस्था केल्या आहेत. ४४ आसन व्यवस्था असलेल्या या बसमधुन फक्त २२ जणांनाच प्रवास करता येणार आहे, असे असले तरी प्रवाश्यांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनीटायझर यासह इतर सुरक्षा साधनांचा नियमीत वापर करून स्वता बरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवायचे आहे. वयोवृध्द नागरीक व लहान मुलांनी शक्यतो प्रवास टाळायचा आहे. शिवाय गरज नसेल तर कोणीही अनावश्यकपणे प्रवास करू नये असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments