अनोखा लग्नाचा वाढदिवस;सोशल डिस्टेंसिंगचा लाखमोलाचा संदेश
लातूर:(प्रा.योगेश शर्मा) गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या एकच गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे कोरोना यात होम क्वारंटाईल,आयसोलेशन हे शब्द नव्यानेच ऐकायला मिळत आहेत.सोशल डिस्टेंसिंग प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात येत आहे.मात्र, यावर अनोख्या पध्दतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न लातुरातील या (रामेश्वर बावळे आणि तेजश्री बावळे) या दाम्पत्याने केला आहे.तुम्ही म्हणाल छत्रीचा वापर केल्याने कुठं सोशल डिस्टेंसिंगवर जनजागृती होते का? पण यातूनच मोठ्या प्रमाणावर सोशल डिस्टनसिंग पाळले जाते ते कसे ऐका छत्रीचा वापर केल्याने आपोआपच दोन व्यक्तीच्या मध्ये किमान 2 मीटर अंतर होते. सध्या उन्हाळाही तीव्र होतोय त्यामुळे अशात बाहेर पडताना प्रत्येकाने छत्रीचा वापर केल्यास आपोआपच सोशल डिस्टेंसिंगचे पालन होईल आणि उन्हापासून आपला बचावही छान आहे ना आयडिया या दाम्पत्याने आपल्या विवाह वाढदिवसानिमित्त दिलेला हा संदेश नक्कीच पालन करण्यासारखा आहे. कारण फायद्याचा आहे.इथे सोशल डिस्टेंसिंग
म्हणजे सामाजिक अंतर नको, मात्र सध्याची परिस्थिती पाहता एकमेकांची काळजी घेण्यासाठी थोडंस डिस्टन्स.
सोशल डिस्टेंसिंगसह मास्कचा वापर करत हा लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याने या दाम्पत्याच्या जनजागृती ला नक्कीच प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.शिवाय,एकमेकांना एक रोपटं देऊन पर्यावरण संरक्षण काळाची गरज हाही लाखमोलाचा संदेश कृती एक जनजागृती अनेक आयडियाच्या कल्पनेला सलाम "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे दाम्पत्याना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
0 Comments