प्रशासनाचे नियम पाळा...
यमाचे निमंत्रण टाळा...
लातूर:(प्रतिनिधी) गांधी चौक परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण,तसेच वाहतुक शाखा नियंत्रण,लातूर च्या वतीने करोना सुरक्षा अभियान या अंतर्गत यामाराजाच्या वेशभूषा धारण करून नागरिकांचे लक्ष वेधून जगात करोनाने अहंकार माजून नागरिक जीवन धोक्यात आले असून त्या रोगापासून नागरिकांचे बचाव कसे करता येईल यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न करत आहेत त्यात नागरिकांनाही आव्हान करतात की सोशल डिस्टेंसिंग चे पालन करा आणि इतरांपासून दूर राहा घराच्या बाहेर पडू नका प्राणाला आमंत्रण देऊ नका यात पोलीस प्रशासन आपल्या परिवाराची व आपली कसलेही जीवाची परवा न करता ते प्रशासन नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत त्या कार्याची कौतुक करेल तेवढे कमी आहे.याकर्यास सलाम त्यात नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडत आहेत आणि कसलेही नियमाचे पालन करत असलेले दिसत नाही या निष्काळजी पणाने आपला व परिवाराचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये आणि सोशल डिस्टेंसिंग चे पालन करणे गरजेचे आहे या सर्व बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच नागरिकांत जनजागृती करण्यासाठी आज आपल्या शहरात चक्क यमराज आले आहेत मृत्यूशी खेऊ नका आपले व परिवाराचे जीवन मोलाचे आहे त्या रोगापासून आपले बचाव व्हावा आणि आपण मिळुन त्याच्याशी लाडुया हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने होईल चला मग करोनाशी लडुया आपले संघर्ष जिंकूया. प्रशासनाने आखून दिलेल्या नियम पालन करण्यासाठी लातूर शहरात यमराजा कडून नागरिकांना प्रशासनाचे नियम सांगून तोंडाला मास्क लावणे,गाडी वर एकटेच राहा,विना कारण घरा बाहेर पडू नका असे सांगून त्यांच्यात जनजागृती करण्यात आले.तसेच मृत्यूला आमंत्रण देऊ नका यमराजाला निमंत्रण देऊ नका असे यमाकडून जनतेत जनजागृती करण्यात आले तसेच.मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने त्यात नागरिकांना प्राण गमवावा लागत आहे,आणि त्यांच्यावर परिवाराचे उपजीविका अवलंबून असते त्याचा त्रास परिवाराला होतो हे केवळ नागरिकांच्या चुकी मुळे अपघात होतात प्रशासनाचे नियम न पाळणे मृत्यूस सामोरे जावे लागते याची पूर्ण काळजी नागरिकांनी घ्यावी ज्याने आपला ही प्राण वाचेल आणि इतरांनाही त्रास होणार नाहि ही जनजागृती करणे कळाची गरज आहे या यमराजाच्या वेशभूषेत नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम घेण्यात आला. उपक्रमात विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश सुनीता कंकनवाडी, प्रभुराज प्रतिष्ठाण चे अँड.अजय कलशेट्टी,साहाय्यक निरीक्षक एस. जी.बंकवाड,अँड.सुरेश सलगरे, जयप्रकाश कलशेट्टी, वाहतूक शाखाचे पोलीस सचिन कांबळे,तसेच वाहतूक शाखा नियंत्रण,लातूर उपस्थित होते.
0 Comments