Latest News

6/recent/ticker-posts

भाजपने सत्तेस असतांना बारा बलुतेदारांसाठी काय केले - वंचितचे प्रवक्ते गोविंद दळवी यांचा सवाल

भाजपने सत्तेस असतांना बारा बलुतेदारांसाठी काय केले - वंचितचे प्रवक्ते गोविंद दळवी यांचा सवाल


मुंबई:(प्रतिनिधी) दि. २३ - राज्यात काल झालेल्या आंदोलनात भाजप नेते बलुतेदार यांना ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करा अशा मागणीचे फलक हातात घेऊन घोषणा देत होते. या प्रकारामुळे राज्यातील बारा बलुतेदार समुहात प्रचंड असंतोष,चीड निर्माण झाली आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा बलुतेदार-अलुतेदार जनजागरण अभियानाचे समन्वयक गोविंद दळवी यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. भाजपने सत्तेत असताना बलुतेदारांसाठी काय केले ते पहिले जाहीर करावे. सत्तेचा मलीदा खातांना भाजपला बलुतेदार आठवले नाही का? आजपर्यंत भाजपने एकाही बलुतेदाराला निवडणूकीत संधी दिली नाही. भाजप विधीमंडळात सुध्दा आजतागायत कधीच बलुतेदारांच्या प्रश्नावर आवाज उठवत नाही. भाजपशासित प्रदेशात फक्त घोषणा केल्या जातात. मात्र एक रूपयाची सुध्दा मदत दिली जात नाही. त्यामुळे बलुतेदारांचे नाव घेण्याचा सुध्दा नैतिक अधिकार भाजपला राहिलेला नाही. कारण भाजपने बलुतेदारांचा मतांचा राजकारणासाठी जेवढा वापर केला तेवढा आजपर्यंत कोणीही केला नाही. भाजपकडे असलेल्या आमदारांपैकी एकही आमदार बलुतेदार नाही. याचे भाजपने भान ठेवावे. बलुतेदारांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यासाठी भाजपने काहीही केले नाही. म्हणुन अशा संकट काळात भाजप बलुतेदारांच्या नावाचा वापर करून घाणेरडे राजकारण करीत असेल तर आम्ही याचा निषेध करतो. यापुढे जर बलुतेदारांचा अपमान कराल तर वंचित बहुजन आघाडी कदापी सहन करणार नाही याची नोंद घ्यावी. असे मत गोविंद दळवी यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments