उदगीर मध्ये नव्याने ५ कोरोना रुग्ण, एकूण २७
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण ५१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ३३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन २८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये ३ डॉक्टरांच्या स्वॅबची पुनर्तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड ११, उस्मानाबाद ३, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ४ असे एकुण ५१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
0 Comments