उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात, होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार
लातूर(प्रतिनिधी) दि.११ उदगीर येथील कोविड-१९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
या संदर्भाने माहिती देताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले की, उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सदया कोविड-१९ मुक्त आहे. दरम्यान संपूर्ण लातुर जिल्हा कोविड मुक्त झाला असतांना उदगीर येथे एका महिलेस कोविड १९ ची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यात त्यांचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता आज पर्यत एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत. उदगीर येथील कोविड-१९ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. यापैकी ११ जणांची प्रकृती ठणठणीत बरी झाली आहे. त्यांच्यात कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे केंदशासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे या ११ रुग्णांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येणार आहे.यापुढील काही दिवस त्यांना त्यांच्या घरी होम क्वॉरनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे, उर्वरित १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांनाही लवकरच सुट्टी देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
0 Comments