राज्य धनुर्विध्या संघटनेकडून "धुऱ्यावरची आर्चरी" ऑनलाईन प्रशिक्षण
ग्रामीण भागातील उदयोन्मुख धनुर्धर
उस्मानाबाद: राज्यातून अधिकाधिक ऑलीम्पिअन घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सध्या महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेकडून ऑनलाईन प्रशिक्षणाचा नवा फंडा हाती घेतला आहे. ११ मे ते १६ मे दरम्यान "धुऱ्यावरची आर्चरी" ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या वेबिनार मध्ये राज्यभरातून ५०० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय धनुर्विद्या महासंघ तथा महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी इशाराला दिली.
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई ) व विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या वतीने आगामी ऑलीम्पिक स्पर्धा लक्ष्यात घेऊन उत्कृष्ठ ऑलीम्पिअन घडविण्याच्या दृष्टीने १५ दिवसांचे ऑनलाईन कोच प्रशिक्षण वोर्कशॉप घेण्यात आले, कार्यशाळेत स्पोर्ट फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, फिजिओथेरपी अँड इंज्युरी प्रेव्हेंशन, स्पोर्ट मेडिसिन, न्यूट्रिशन, बायो मेकॅनिक्स, अँथ्रोपॉमेट्री यासह डोपिंग आदी महत्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले.आर्चरी सेशन मध्ये १२०० जणांनी नोंदणी केली होती. या कार्यशाळेच्या यशस्वीतेनानंतर नवनवीन संकल्पनांची आखणी केली गेली असून सध्या त्या अमलातही आणल्या जात आहेत, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेकडून ग्रामीण भागातील प्रतिभावंत ऑलीम्पिअन घडविण्याच्या दृष्टीने 'धुऱ्यावरची आर्चरी' ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, ग्रामीण भागातील खेळाडूंना आवश्यक साहित्याचा नेहमीच अभाव असतो यातच चांगले प्रशिक्षक, मैदान, क्रीडा मंडळे स्वाभाविकच यांचीही खेळाडूंना चुणूक भासते. गाव खेड्यातून धुऱ्यावर म्हणजेच थेट बांधावरून आहे त्या साधनामध्ये कश्या प्रकारे धनुर्विद्या प्रशिक्षण घेतले जाऊ शकते याचे प्रशिक्षण खेळाडूंना देऊन गुणवंत खेळाडू घडविणे हा मुख्य उद्देश प्रशिक्षणाचा असणार आहे.
Zoom व्हडिओ अप्लिकेशन द्वारे घेण्यात येणार प्रशिक्षण,
"धुऱ्यावरची आर्चरी" तज्ज्ञांच्या साहाय्याने प्रोग्रॅम बनविण्यात आला असून ग्रामीण भागातील खेळाडूंची जडण घडण, आवश्यक तंत्रज्ञान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, प्रशिक्षण या विषयावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सेशन सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना या ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये Zoom या व्हडिओ अप्लिकेशन द्वारे सहभागी होता येणार आहे.
"आपण ज्या ठिकाणी राहता, त्याच ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनामध्ये खेळा व आपल्या प्रतिभेला वाव द्दा" या संदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हा प्रथमच प्रयोग अवलंबिला जात असून हे देशासाठी रोल मॉडेल ठरेल, त्यातूनच दिग्गज खेळाडू देशास मिळतील. असा विश्वास
प्रमोद चांदुरकर, सचिव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना यांनी व्यक्त केला
0 Comments