Latest News

6/recent/ticker-posts

योगाचे ऑनलाईन लाईव्ह प्रशिक्षण शिबिर 

योगाचे ऑनलाईन लाईव्ह प्रशिक्षण शिबिर 



लातूर:(प्रतिनिधी) आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.सध्याच्या कोरोना आजाराच्या परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर दररोज काही वेळ योगसाधाना केली तर करोनाला दूर ठेवू शकता. सध्याच्या परिस्थितीत सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन करणं अधिक लाभदायक आहे.योगसाधना ही योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावी,असा सल्ला योगतज्ज्ञांकडून दिला जातोय व व्यायामाला बाहेर जाण्यावर बंदी असून आशा काळात नागरिकांसाठी झूम, फेसबुक, इंन्स्टाग्राम सारख्या डिजिटल माध्यमातून लाईव्ह योगा, प्राणायाम सेशन दिले जात आहे. याशिवाय स्वतः योग आणि प्राणायामसह सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करत असून आरोग्यावर लक्ष देत आहेत. इतरांना याचा लाभ होण्यासाठी योगाचे ऑनलाईन लाईव्ह सेशन/वर्गाचे 5 जुन पासून सुरूवात होत असून क्रीडाप्रेमीनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे अहवान रुरल अँड अर्बन योगा असोसिएशन,लातूरचे अध्यक्ष के.वाय.पटवेकर,सचिव मुजीब सय्यद,मुख्य योगा प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच अमरदीप पाटील,योगा प्रशिक्षक तथा पंच ओंकार गादगे{BA yogic sciences} यांनी केले आहे.अधिक माहिती साठी खाली भ्रमणध्वनी:9595474755 / 9270888587 / 9130960258 / 7385719005 क्रमांकावर संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments