लातुरात 'वसुंधरा' तर्फे झाडांचा वाढदिवस साजरा
विलासराव देशमुख जयंतीनिमित्त लावले होते गतवर्षी ३०१ 'विकास वृक्ष'
लातूर - लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहर आणि ग्रामीण भागात गतवर्षी आणि त्यापूर्वी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ३०१ झाडे लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 'विकास वृक्ष' ही संकल्पना लातूर जिल्ह्यात प्रतिष्ठानने सुरू केली.लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यात वसुंधरा प्रतिष्ठानने 'विकास वृक्ष' ही संकल्पना लातूर जिल्ह्यात सुरू केली. गत तीन वर्षांत जयंतीनिमित्त वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे गंगापूर, भुसनी, काटगाव, गाधवड, जोडजवळा, लातूर शहर आदी ठिकाणी ३०१ झाडांची लागवड केली आहे. या उपक्रमाला 'विकास वृक्ष' असे नाव देण्यात आले आहे. गत तीन वर्षांत लावलेल्या झाडांचा वाढदिवस प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. शहरातील गांधी चौकातील झाडाला फुगे बांधून, केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संघटक प्रशांत स्वामी आदींची उपस्थिती होती.
0 Comments