विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ८० आरोग्य सेवकांची तपासणी सर्व अहवाल निगेटिव्ह
पालकमंत्री देशमुख यांचेकडून सर्वांचे अभिनंदन व कौतुक
लातूर (प्रतिनिधी) दि.२२ मे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोविड-१९ रूग्णालयात सेवा देणाऱ्या ८० आरोग्य सेवकांची कोविड-१९ प्रतिबंधात्मक तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, या बददल राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्वाचे चांगल्या कामा बददल अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
कोविड-१९ रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, मेडिक्स, पॅरामेडिक्स, इतर कर्मचारी, सफाई कर्मचारी या सर्वांच्या नियमित तपासणी करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या आहेत.लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोविड-१९ रुग्णालय असून याठिकाणी अशा रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणारी प्रयोगशाळाही आहे. याठिकाणी लातूरसह उस्मानाबाद, बीड येथील स्वॅब नमुने तपासणीसाठी येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार मागच्या दोन दिवसात कोविड-१९ रुग्णालयात सेवा देणाऱ्या आणि प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तपासणी करून घेतल्या आहेत. तपासणी केलेल्या या सर्वच्या सर्व म्हणजे ८० कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वैयक्तिक सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन महाविद्यालयातील सर्व कर्मचारी योग्य पद्धतीने काम करीत असल्याबद्दल पालक मंत्री देशमुख यांनी या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
0 Comments