मुलीच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री निधीला
औसा:(प्रतिनिधी /नदीम सय्यद)कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वजण संकटात सापडल्यामुळे औसा आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल झंवर यांनी आपली मुलगी कु, किर्ती मदनलाल झंवर या फिजियोथेरेपीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या 20 वा वाढदिवस साध्या पद्धतीने घरी करून वाढदिवसाचा होणारा खर्च 20 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेशाद्वारे देऊन समाजा समोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे, मदनलाल झंवर यांनी 20 हजार रुपयांचा धनादेश शिवसेना जिल्हा प्रमुख तथा औसा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संतोष सोमवंशी यांना सुपूर्द केला यावेळी सर्वश्री नामदेवमामा चाळक ,भुजंग सोमवंशी, चंदुलाल झंवर, संजय मुंदडा व परिवारातील सदस्य उपस्थित होते ,मुलीच्या वाढदिवसा निमित्त कोरोना ग्रस्ता साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केल्यामुळे औसा आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल झंवर यांचे कौतुक होत आहे,
0 Comments