काळाची झडप .....
जीवनातील जगण्याचा काळ संपला की मानवी देह सोडून आत्मा शरिरापासून दूर होतो. मृत्यू कोणत्या वेषात येईल , याची तीळमात्र कल्पना नसते. पृथ्वीवरील कर्म संपले की देह त्याग करावाच लागतो . हे मात्र सत्य असताना, मृत्यूने कोणत्या वेषात झडप घालावी हे मात्र अभिज्ञच . जन्म मृत्यूच्या मधला काळ मनुष्य आपल्या आयुष्याशी क्षणाक्षणाला दोन हात करत जगत असतो. सुखमय जीवन जगावे असे प्रत्येकांना वाटते. चूक नसतानाही काळ आपल्या खुशीत घेतो. हे मात्र दुर्दैवच . करमाड - सटाणा ( औरंगाबाद) येथील घटना खुपच -हदय हेलवणारी होती. मालगाडीने निष्पाप मजुर , गरीब व्यक्तीवर सवार झाली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं . बापरे ! काळजाचा थरकाप होते. मनातील धडधड काही अंशी थांबल्यासारखी वाटते... विचारांचा डोक्यात काहूर माजतो . काही क्षणात वाटतं की हे देवा कितपत योग्य होतं ..... जी आपल्या पदरातील अन्न पोटात न घालता, वनवन चालत आपल्या नात्यातल्या प्रेमळ कुटूंबात सामील होणासाठी जाणा-याची काय चूक ..... थकलेले पावले विसवणार पण इतके विसवणार याची कल्पना नव्हती. कुंभकरणाची झोप होती काय हो ....की मालवाहू रेल्वेचा हाॅर्न वाजला तरी जाग येवू नये .....काळाची छाया दुसरे काय .... शरीराचे छिन्न विछिन्न झालेले तुकडे गोळा करताना थरकाप उटतो. काहींना फरफटत दूरवर नेतांना होणा-या वेदनेची आपण कल्पना देखील करु शकत नाही. प्रासंगिक चित्र डोळ्यासमोर तरळत असताना डोक्यात काहूर माजतो. असवस्थ होवून जीवन थांबल्यागत वाटतं.....सध्या दोघावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. जीव बलत्वर म्हणून चार जण वाचले. वाचलेल्या व्यक्तींनी भेटणा-यांना घटनेचं विवरन करावे की , गेलेल्यांचा शोक करावा. अशी दुविधा आवस्था झाली आहे . अप्तेईष्ठ सोडून गेल्याने उर बडवून आक्रोश करण्यापलिकडे त्यांच्याकडे काहीच उरले नव्हते. १६ जण मरणाच्या छायेत विलीन झाले होते. सर्वजन एका कुटूंबातले नव्हते. तर रक्ताच्या नात्यातीलही नव्हते . पण एका मातीतले होते .एवढे मात्र खरे.... शेवटी करुन अंत अंगी धावून आलाच.... बातमी वा-यासारखी पसरली आणि महाराष्ट्रभर ऐकणा-यांचा थरकाप उडाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतही त्यांनी जाहीर केली . तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार सुध्दा करण्यात येत आहे. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले. पण निष्पांचा जीव मात्र गेला..... पैसा आणि आपल्या कुटूंबाची पोटखळगी भरण्यासाठी कोसोमील दूर येवून, शेवटी हातात काहीच राहिले नाही . आयुष्यभर ज्याच्यासाठी राबराब राबत होतो. शेवटपर्यंत त्या चंद्रकोर भाकरीनेच मरणाच्या दारापर्यंत साथ दिली.....
- अरुणकुमार बालाजीराव मेहत्रे(पत्रकार)
नवी मुंबई
0 Comments