कोरोना आणि दारू.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी दारू विक्रीला (रेड झोन सुद्धा) परवानगी दिली आहे.... आणि दारू कंपनीने पूर्वीपासूनच यांच्यामध्ये branding करून किंमतीमध्ये गरीब आणि श्रीमंत दोघांनाही परवडेल अशी सोय केली आहे जशी इतर कुठल्याही वस्तूंची असते......आता काही Highly Educated Intellectuals लोकांचं म्हणणं आहे की कशाला पाहिजे गरिबांना दारू....मग दारू पिणार्यांना राशन देऊ नये.... किती लांब उन्हांत रांगा लावून थांबतायेत...आता कसे मरत नाहीत....वगैरे वगैरे त्यांनी खुशाल अकलेचे तारे तोडावे.....
आणि मध्यप्रेमींनी देखील आपल्या दारू खरेदीमुळेच देशाची अर्थ व्यवस्था टिकून आहे असे डोक्यात भुसा भरल्यासारखं काहीही बोलू नये.....दारू पिणाऱ्या मध्ये 3 category आहेत...
1No. Category - ही मजूर आहेत यांना जर बोललं की भाऊ बरं झालं दारू बंद झाली आता तुमचे पैसे वाचतील... तर ही लोकं 1 सेकंदाचा ही विलंब न लावता बोलतील की भाऊ ह्याच्यापुढे असलं बोलायचं असेल तर आपलं बोलणं बंद का तर आमचे पैसे खर्चली तरी चालतील कारण आम्हाला सर्व विसरून झोप येण्यासाठी दारू प्यायची आहे....काय बोलावं थोडासा rate वाढवून भेटली तरी यांची घ्यायची तयारी आहे.....
2No. Category - ही मालक लोकं आहेत यांना विचारायची सोयच नाही आम्ही आमच्या पैशाची पितो कोणाच्या बापाच्या पैशाची पीत नाही म्हणून मोकळे होतील...ही लोकं group ने आहेत यांच्याकडे खूप sources आहेत...ही लोकं दुप्पट तिप्पट रक्कम देऊन ती विकत घेतात... अगदी जेव्हा पहिला curfew लागला त्या दिवसापासून आजपर्यंत ही पितायेत... आता हा संशोधनाचा विषय आहे यांना मिळते कशी त्याच्या खोलात न गेलेलं बर.... पण पिण्याचा ultimate aim एकच सर्व विसरून निवांत झोपायचंय.....
3No. Category - ही दर्दी मध्यमवर्गीय आहेत ही कधीतरी आठवड्याला पितात..... आणि दारू वरती एखाद्या प्रेयसी सारखं ही लोक प्रेम करतात.... आठवड्याचा विरह सहन न झाल्यामुळे ही पितात... यांच्यात एक वैशिष्ट्य आहे ही आहे त्या किमतीतच घेतात...आपल्या दारुरूपी प्रेयसीचा सौदा करत नाहीत...यांना पिऊ नका हे सांगणे म्हणजे साक्षात एखादं प्रेमी जोडपे दूर केल्यासारखं आहे....नको रे बाबा....पण यांचा ही aim तोच की आठवड्याच्या विरहाचा त्रास विसरून झोपायचंय......
या सर्वांचा aim एकच आहे यांना सर्व दुःख विसरून निवांत झोपायचे आहे....उद्या उठण्यासाठी .....राज्यकर्त्यांनो तुम्ही देखील तुमची निवांत झोपायची सोय केलीच असेल होय करायलाच पाहिजे किंबहुना तुम्ही ती केलेलीच असेल तर स्थानिक प्रशासनाला देखील सांगा की या प्रतिष्ठित प्रेयसीला तिच्या प्रतिष्ठित प्रियकाराजवळ प्रतिष्ठित पध्दतीने प्रतिष्ठितपणे पोहचवा..... ह्यातच सौख्य सामावले आहे.....
आज जो देशातील मजूर मरण हाथा वर घेऊन चालतोय.... उद्या या मध्यप्रेमींचा देखील बांध फुटू शकतो.... Honorable Prime Minister यांनी यांच्याशी देखील 'मन की बात' करून यांना धीर दिलाच पाहिजे..... प्रसंगी मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली यांनादेखील कोरोना positive नसताना self quarantine करायची गरज लवकरच पडेल.....
मैं तेरी मस्त निगाहें का भरम रख लुंगा.... होश आया भी तो कह दुगा मुझे होश नहीं !!
हंगामा हैं क्यूँ बरपा थोडीसी जो पी ली हैं....
डाका तो नहीं डाला,चोरी तो नहीं की हैं...!!!(ghulam ali)
हमको किसके गम ने मारा ये कहानी फिर सही..
किसने तोडा दिल हमारा ये कहानी फिर सही...!
राजेश विठ्ठलराव तांदळे
Cell: 9763664155
Mail : tandle.raj@gmail. com
0 Comments