मराठा सेवा संघाच्या चळवळीतला सच्च्या सोबती हरवला-प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार
औसा (प्रतिनिधी:नदीमभाई सय्यद) मराठा सेवा संघाची सामाजिक व वैचारिक चळवळ अनेक निर्भिड, कर्तृत्ववान, धैर्यवान व्यक्तींच्या समर्पणावर चालत आलेली आहे. अशा समर्पित व्यक्तींमध्ये शांताराम बापू कुंजीर हे एक होते. असे मराठा सेवा संघांचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी स्वर्गीय बापू कुंजीर यांना शिवांजली पर बोलताना व्यक्त केले.
शांताराम बापूंनी मराठा सेवा संघाची वैचारिक लढाई आणि विविध पुरोगामी चळवळी अशा अनेक पातळीवर समर्थपणे लढली. शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार तळागाळातल्या बहुजनांपर्यंत पोहोचावा, यासाठी शांताराम बापूंनी अनेक मेळावे, सोहळे, संमेलने आयोजित केली. चळवळ अधिक सक्षम व्हावी, संघटनेच जाळं महाराष्ट्रभर पसराव व समाजाची उन्नती व्हावी यासाठी शांतारामबापूंनी प्रचंड प्रवास केला.
0 Comments